ज्येष्ठ शिक्षक नेते प्राचार्य एम. एस. मरकड यांचे निधन

 ज्येष्ठ शिक्षक नेते  प्राचार्य एम एस मरकड  यांचे निधन अहमदनगर -जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षक नेते व सेवानिवृत्त प्राचार्य मोहनराव मरकड तथा एम एस मरकड सर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

 त्यांचे वय 83वर्ष होते  अंबिका महिला बँकेच्या संस्थापक संचालिका प्रा पुष्‍पा मरकड यांचे पती होत. महाराष्ट्र  साहित्य परिषदेचे शाखा कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार किशोर मरकड व सामजिक कार्यकर्ते नितीन मरकड यांचे ते वडील आहेत.

 प्राचार्य एम एस मरकड सर जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षक नेते होते तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य होते. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ते पंधरा वर्षे संचालक ,सहा वर्ष  अध्यक्ष, तीन वर्ष चेअरमन पद त्यांनी भूषवले होते. तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीतील सहकार सेवा मंडळाचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले होते. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात त्यांचा नेहमीच पुढाकार होता मुख्याध्यापक संघाचे ते सरचिटणीस,सचिव व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पदभार स्वीकारला होता यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे ते संस्थापक सचिव होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षक संस्थेत ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले आणि प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या काळात शालेय इमारत उभारणी, विविध शालेय उपक्रम राबवून शिक्षणाचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी  पुढाकार घेतला होता.अहमदनगर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री नामदार शंकराव गडाख, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार अरुण जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ताई ढोणे, सभापती अविनाश घुले, संगमनेरच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, अंबिका महिला बँकेच्या संस्थापिका मेधाताई काळे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे ,सचिव जी.डी. खानदेशे, खजिनदार मुकेश मुळे, विश्वस्त जयंत वाघ, विश्वस्त विश्वासराव आठरे, नगरसेवक  अजय चितळे, नगरसेवक दीपक चव्हाण,  धनंजय जाधव विनित पाऊलबुधे, निखिल वारे,सुनील  त्रिंबके, बाळासाहेब पवार  विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉक्टर सागर बोरुडे, शिवाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक संजय घुले, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे सचिव व मराठा पतसंस्थेचे चेअरमन इंजि. विजयकुमार ठुबे अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष  शिवाजीराव शिर्के,  महाराष्ट्र राज्य  डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे अध्यक्ष  राजा माने यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील शिक्षक नेत्याला आम्ही गमावले असा शोकसंदेश महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पाठवला आहे.  त्यांच्यावर आज दुपारी अहमदनगर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post