कोरोना काळात आरोग्याची परिस्थितीत हातळण्यात राज्य सरकार अपयशी- आमदार राजळे

 कोरोना काळात आरोग्याची परिस्थितीत हातळण्यात राज्य सरकार अपयशी . आमदार राजळे;दिपाली प्रतिष्ठान व गोकुळ दौंड मित्र मंडळाच्या वतीने सुमारे तीनशे बेडचे कोविड सेंटरची उभारणी.


पाथर्डी -ज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण झाले आहे.दिवसंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता सर्वसामान्याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना बाधित रुणांना उपचारासाठी बेड मिळत नाही. अनेकांचे अहमदनगर, पुणे ,औरंगाबाद येथील रुग्णालयात औषध  उपचारासाठी बेड मिळेल का? असाच आग्रह आमच्या सारख्या लोक प्रतिनिधीकडे लोकांचा आहे. एखाद्या दोन व्यक्तीतला बेड उपल्बध होतो मात्र अनेकांना रुग्णालयात जागा मिळत नाही. यासर्व आरोग्याच्या बाबत शासन कमी पडत असून हे अपयश राज्य सरकारच आणि येथील नेते मंडळीच आहे. असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.पाथर्डी तालुक्यातील आगसाखंड शिवारात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विखे बेल्डिंग मध्ये दिपाली प्रतिष्ठान व गोकुळ दौंड मित्र मंडळाच्या वतीने सुमारे तीनशे बेडचे स्व गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटरची उभारणी केली असून त्याचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी राजळे बोलत होत्या.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शाश्री,हभप संतोष महाराज भारती,पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर,एकनाथ आटकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, प्रवरा नगर येथील भूषण कोंडरे,राजेंद्र दौंड,युवनेते अमोल गर्जे,मुकुंद गर्जे,रणजित बेळगे,अर्जुन धायताडक, बाळासाहेब गोल्हार,बंडू पठाडे,विष्णू देशमुख,सतीश मासळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना राजळे म्हणाल्या,कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणा कमी पडून हतबल होऊन ठप्प झाली आहे.काही रुग्णांना उपचार मिळत नाही. दररोज जिल्ह्यात पन्नास ते साठ लोकांचा मृत्यू होत असून ह्या मृत्यूच्या आकडा बाबत साशंकता यावेळी राजळे यांनी व्यक्त करून सध्या गंभीर परिस्थितीत कोरोना संसर्गाची आहे.तालुक्यात याचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल त्यासाठी तालुका पातळीवर अधिकारी वर्गाबरोबर वेळोवेळी बैठका घेऊन अनेक निर्णय घेतले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.सध्याच्या काळात आपल्याला आरोग्य सेवा मिळू शकत नाही.राज्य सरकारचे खूप मोठे अपयश आहे.याच्यावर राजकारण केले जात आहे.देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर शासनाला मदतीच्या भूमिकेतून पुढे येत असतांना त्यांच्यावर खालच्या पातळीवर शिवसेनेचे एक आमदार टीका टिपण्णी करतात.ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.पाथर्डी शेवगाव मध्ये दोनशे बेडचे कोविड सेंटर उभारूण आमदार निधी कसा अधिक कोरोना काळात खर्च करता येईल त्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे राजळे म्हणाल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांच्यावर टिका करत महाराष्ट्रामध्ये प्रमुख जिल्हयामध्ये अहमदनगर जिल्हा कोरोनाची तिव्रता असलेला जिल्हा आहे, जिल्हयामध्ये मंत्रीपदे दिली आहेत ते मंत्री भेटायला तयार नाहीत, पालकमंत्री एक ते दोन महिन्यातुन एकदा  येतात त्यांचे स्वत: उदयोग उरकुन निघुन जातात  आरोग्यसेवा, सौरक्षण आदि सर्व पातळीवर हे सरकार जनतेचा विचार करण्यास तयार नाही. भविष्यकाळात पालकमंत्री यांना या जिल्हयामध्ये आल्यानंतर जनता याचा जाब नक्की दयावा लागेल जनता फिरु देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगीतले
स्व गोपीनाथ मुंडे कोविड सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय उपचारासाठी याचा चांगला फायदा होणार आहे.याठिकाणी औषध उपचार,जेवण, नाष्टा, चहा, पाणी मोफत दिपाली प्रतिष्ठान व गोकुळ दौंड मित्र मंडळाकडून रुग्णांना दिले जाणार आहे.असे दौड म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट फुंदे यांनी करू उपस्थितांचे आभार गोकुळ दौंड यांनी मानले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post