केंद्र लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा'चा भार उचलत आहे

केंद्र लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा'चा भार उचलत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या इमारतीचे हजारो कोटी रुपयांचे काम सुरू ठेवले आहे. दिल्लीत कडक लॉकडाऊन असताना हे काम बंद पडू नये, यावर भर दिला जात आहे. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत मजुरांना दिल्लीत आणले जात आहे. देश आर्थिक अडचणीत असताना, हजारो कोटींच्या या प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही, असे ट्विट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post