आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही

 

आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची बदनामी सहन केली जाणार नाहीमुंबई : कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील सत्ताधाऱ्यांना, भारत सरकारला आलेल्या अपयशावर लक्ष वेधत जागतिक स्तरावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अनेक जागतिक माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पण, देशाची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत असं लक्षवेधी वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. 

मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता समन्वय असून, ते येत्या काळात योग्य तोच निर्णय घेतील, आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.   देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयानं अतिशय गंभीर टीप्पणी केली. ज्यामुळं देशातील विविध राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला निशाणा केलं गेलं. या टीप्पणीचा पंतप्रधान गांभीर्यानं विचारही करतील असंही ते म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post