कोरोना काळात अंत्यविधी नगर शहरातच करा-राठोड

 कोरोना काळात अंत्यविधी नगर शहरातच करा : विक्रम राठोड यांचेजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सर्व अंत्यविधी नगर शहरात करण्याचे चालू ठेवावे असे निवेदन नगर जिल्हा युवा सेनेचे प्रमुख विक्रम अनिल राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबतचा इमेल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले याना पाठविला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अप नंबरवर हे निवेदन पाठविण्यात आले आहे. 

              सध्या नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज  मृतांचा आकडा ६० ते ६५ च्या घरावर जात आहे. या परिस्थितीत कोरोना मुळे मृत्यू झालेल्या मृतांचे अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशान भूमीत करण्यात येतात. यामुळे नगरच्या अमरधाम स्मशान भूमीवर ताण येत असला तरी हे अंत्यविधी नगर शहरातच व्हावेत. जे दगावलेले रुग्ण नगर शहराबाहेरील आहेत त्यांचा अंत्यविधी त्या त्या गावात करण्याचा विचार करू नये कारण त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. 

नगर शहरात जे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडतात त्यांचा अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशान भूमीत केले जातात . त्यावेळी अहमदनगर मनपाचे कर्मचारी तसेच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडणारे सर्व जण या रोगाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता बाळगून काम करतात. पण जर हे अंत्यसंस्कार इतरत्र कोठेही करण्याची आपण परवानगी दिल्यास प्रत्येक ठिकाणी कोरोना संसर्ग न होण्याबाबत काळजी घेतली जाणार नाही. 

                तसेच नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात नगर जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्याच्या बाहेरून आलेले गोर गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या कोरोनाच्या काळात यापैकी मृत झालेले रुग्ण पालिकेने अंत्यसंस्कारासाठी ताब्यात न घेता त्या त्या नातेवाईकाकडे दिले तर ते चुकीचे ठरेल . कारण प्रत्येक ठिकाणी असे अंत्यसंस्कार केले गेल्यास त्या त्या गावात अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या लोकांना या रोगाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.  कोरोना काळात मृताचे नातेवाईक देखील मृतदेहास हात लावत नाहीत . लांबूनच दर्शन घेतात . तसेच अंत्यसंस्कार करणारे पी पी ई किट घालून खबरदारी बाळगतात. अशा स्थितीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हा माणुसकीला धरून नाही . त्यामुळे याचा विचार करावा असे विक्रम अनिल राठोड यांनी म्हंटले आहे. 

रुग्ण मृत होण्याची संख्या वाढल्यामुळे खरे तर नगरच्या अमरधामातील विद्यत दाहिनीवर मोठा ताण आलेला आहे सोबत अमरधाम मध्ये लाकडावर अग्नी डाग देण्यासाठी जागा शिल्लक रहात  नाही  तेव्हा नगर मनपा केडगाव , बोल्हेगाव , भिंगार आणि रेल्वेस्टेशन येथील स्मशान भूमीचा वापर करू शकते. तिथे उरलेले अंत्यविधी करण्यास हरकत नाही पण संपूर्ण नगर जिल्ह्यात त्या गावी अंत्यविधी करण्याचे ठरविण्यात आल्यास रोगाचा संसर्ग वाढून आणखी परिस्थिती गंभीर होण्याचा धोका प्रशासनाने पत्करू नये ही विनंती  विक्रम अनिल राठोड यांनी या निवेदनात केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post