७० वर्षिय कोरोना बाधित आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात

 ऑक्सीजन लेव्हल ६५ : वय वर्ष ७० : सर्व कोविड सेंटरने भरती करून घेण्यास दिला होता नकार


रतडगावच्या आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात

नगर तालुक्यातील-रतडगाव येथील ७० वर्षिय कोरोना बाधित असणाऱ्या आजीबाईची ऑक्सिजन लेवल खालावत जाऊन थेट ६५ पर्यत आली .कोविड सेंटर , जिल्हा रुग्णालयाने भरती करून घेण्यास नकार दिला . आता सगळे संपले असे वाटत होते . मात्र त्यांनी धैर्याने कोरोनाला तोंड दिले . घरात राहुन औषधोपचार केले आणि काही दिवसातच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली . 

गर्भगिरीच्या कुशीत वसलेले रतडगाव ( ता. नगर ) येथील ७० वर्षिय  केशरबाई बन्सी चेमटे यांना ताप , अंगदुखी , खोकला अशी लक्षणे दिसु लागली . त्यांच्या कुंटुबियांनी त्यांची कोरोना चाचणी केली त्यात केशरबाई बाधित आढळुन आल्या . त्यांना लगेच बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटर येथे भरती करण्याचा निर्णय त्यांच्या कुंटुबियांनी घेतला . तेथे त्यांची ऑक्सिजन लेवलची तपासणी केली असता ती थेट ८o च्या आत दिसुन आली .
बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटरमध्ये त्यांना भरती करून घेतले नाही . मग त्यांना जिल्हा रूग्णालयात भरती करण्यासाठी नेण्यात आले . मात्र तेथे ऑक्सिजन बेड शिल्लक नव्हते . इतर ठिकाणी ही अशीच परिस्थिती होती . यामुळे नाईलाजास्तव त्यांना पुन्हा घरी  नेण्यात आले .डॉक्टरांची औषधे व काही घरगुती उपाय सुरू करण्यात आले . काढा, अंडी तसेच इतर पौष्टीक  आहार त्यांना सुरू करण्यात आला . काही दिवस घरीच औषधोपचार केल्यानंतर त्यांचा थकवा , अंगदुखी कमी झाली . आता त्या घरातच राहुन जनावरांना चारा टाकणे , पाणी पाजणे व इतर घरगुती कामे करत आहेत .मोठया धैर्याने त्यांनी कोरोनाला हरवत आपला दिनक्रम सुरू केला आहे .
कोरोना हा बरा होणारा आजार असुन वेळेत तपासणी , औषधोपचार , आणि तुमची सकारात्मक इच्छाशक्ती हवी असे केशरबाई आवर्जुन सांगतात .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post