कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी आर्थिक मदत आणि १०० टक्के मोफत लसीकरण करा

 कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी आर्थिक मदत आणि १०० टक्के मोफत लसीकरण जाहीर करा

राष्ट्र सेवा दलाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 जिल्ह्यातील देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या लोकांसाठी खुल्या करावेत !!नगर – लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक परवड, कोरोना ग्रस्त कुटुंबाचे दवाखान्यात झालेला व होत असलेला खर्च पहाता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, येणारी तिसरी लाट थोपविण्यासाठी शंभर टक्के मोफत लसीकरण करून कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी अहमदनगर राष्ट्र सेवादलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली व जिल्ह्यातील सर्वधर्मीय देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या कोरोना ग्रस्त लोकांसाठी लस, ओक्सिजन, प्लाझ्मा आदींसाठी खुल्या करावर असेही आवाहन केले आहे.

राष्ट्र सेवा दल सेवापथकाची जिल्हा बैठक माजी राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी या मागण्यांचे ठराव करण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाच्या सेवापथकाच्या कामाच्या आढाव्याची बैठक घेण्यात आली. ऑनलाईन झालेल्या बैठकीत सुरुवातीला राज्य सेवापथक प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्तावना माजी राष्ट्रीय  महामंत्री विनय सावंत यांनी केली तर माझी सर्ववेळ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनी सेवा कार्याच्या आढाव्याचे वाचन केले. 

या बैठकीला राष्ट्रीय महामंत्री अल्लाउद्दीन शेख, जिल्हाकार्याध्यक्ष राजश्री शितोळे, संघटक बापू जोशी, शिवाजी नाईकवाडी, श्रीनिवास पगडाल, अर्जुन वाळके, दत्ता दिकोंडा, उमेश डोंगरे, अॅड नईम इनामदार, अॅड, गोपीनाथ घुले, गोरक्ष जाधव, सुरेखा आडम, ॲड. रविंद्र शितोळे, गोविंद आडम, भीमराज कोडंम, सुखदेव इल्हे सर, राजेंद्र राऊत, रशीद मणियार, उज्वला कर्डीले, प्रवीण पाटील, धनंजय मलाव, नम्रता पवार, रवी मेढे, मनीषा कोकाटे, शशिकांत कंकरेंज, दिलीप जाधव, हनुमंत उबाळे, सूर्यकांत कोल्हे, सिराज शेख, गोरक्ष जाधव, चंद्रकांत कोकाटे, ज्योती रामदिन, रवींद्र राऊत, रजत अवसक, सुदर्शन शिंदे. आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post