ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात वीज बिलाची पठाणी वसुली, शेतकरी आक्रमक...video

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात वीज बिलाची पठाणी वसुली, शेतकरी आक्रमक  राहुरी- उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदार संघातील कोंढवड येथे विजबिलाच्या पठाणी वसूली मुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करून  संताप व्यक्त केला.

दरम्यान राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून  महावितरणाने रोहित्र बंद करून विजबिल वसूलीसाठी वेठीस धरले आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने चारापि करपू लागले आहे. अवकाळी पावसाने व गारपिटीने रब्बी पुर्ण उध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावेळी उत्तमराव म्हसे, संभाजी पेरणे, तानाजी नेहे, ज्ञानदेव म्हसे,राजेंद्र म्हसे, पोपटराव म्हसे, आप्पासाहेब म्हसे, मधुकर म्हसे,सुनील म्हसे, जगन्नाथ म्हसे, जनार्दन म्हसे, मच्छिंद्र हिवाळे, शिवाजी म्हसे, आबासाहेब म्हसे, संजय म्हसे, संभाजी म्हसे, दत्तात्रय गाढे, पोपटराव थोरात, मच्छिंद्र म्हसे, विजय ते शेतकरी उपस्थित होते

राजेंद्र उंडे  

प्रतिनिधी

video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post