खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यु?, पोलिसांकडून कसून चौकशी सुरु


खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यु?, पोलिसांकडून कसून चौकशी सुरु


नगर : शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी चार ते सात कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्सिजन आभावी मृत्यू झालेल्याची ही शहरातील मोठी घटना आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्णालयात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून घटनेची चौकशी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची टंचाई भासत आहे. अनेक खाजगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपला आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातून अशा घटना घडत आहेत. शहरातील अशाच एका हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असताना संबंधित हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पातळी घटली. त्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरेसा मिळाला नाही. ऑक्सिजनवर असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्यानुसार संबंधित हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post