एमआयडीसी येथील ऑक्‍सीजनचा प्‍लॅट सुरू होणार,दररोज 600 टाक्‍या ऑक्‍सीजन आरोग्‍य सेवेसाठी उपलब्‍ध होणार

 उदयासपासून  एमआयडीसी येथील ऑक्‍सीजनचा प्‍लॅट सुरू होणारदररोज 600 टाक्‍या ऑक्‍सीजन आरोग्‍य सेवेसाठी उपलब्‍ध होणार – मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे


 


 


नगर -  कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव राज्‍यासह नगर जिल्‍हयामध्‍ये मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे अनेक जास्‍त लक्षणे असलेले कोरोना रूग्‍ण मोठया प्रमाणात आढळत आहे. नगर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातून अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचारासाठी शहरात दाखल होत आहे. या रूग्‍णांना ऑक्‍सीजनची गरज भासत आहे. परंतु राज्‍यासह नगर जिल्‍हयामध्‍ये ऑक्‍सीजनचा तुतवडा जाणवत असल्‍यामुळे कोरोना रूग्‍णांवर उपचार करण्‍यास डॉक्‍टरांना अडचण निर्माण होत आहे. यासाठी एमआयडीसीतील रमेश लोढा यांच्‍या अहमदनगर इंडस्‍ट्रीयल गॅसेज प्रा.लि. ऑक्‍झीजन प्‍लॅटला भेट देवून सुरू करण्‍याची विनंती केली. असून उदया पासून ऑक्‍सीजन प्‍लॅट सुरू होणार असून 600 ऑक्‍सीजनच्‍या टाक्‍या भरल्‍या जातील व नगर शहरामध्‍ये ऑक्‍सीजनचा झालेला तुतवडा भरून निघण्‍यास मदत होणार आहे. अशी माहिती मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली.


      कोरोना रूग्‍णांवर उपचार करण्‍यासाठी ऑक्‍सीजनचा तुतवडा जाणवत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसी येथील अहमदनगर इंडस्‍ट्रीयल गॅसेज प्रा.लि.या ऑक्‍सीजनच्‍या प्‍लॅटला मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी भेट देवून सुचना दिल्‍या. यावेळी भाजप मंडल अध्‍यक्ष श्री. अजय चितळे, संचालक श्री.रमेश लोढा, श्री.विलास लोढा, श्री.राहुल लोढा, श्री.पंकज लोढा, श्री.सागर निमसे, श्री.किशोर वाकळे, श्री.शिवा आढाव आदी उपस्थित होते.


      श्री.रमेश लोढा म्‍हणाले की, आमचा एमआयडीसी येथील अहमदनगर इंडस्‍ट्रीयल गॅसेज प्रा.लि. कंपनीचा ऑक्‍सीजन प्‍लॅट उभा असून मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी भेट देवून सुरू करण्‍याबाबत विनंती केली असून सकारात्‍मक दृष्टिकोनातून व सामाजिक भावनेतून नागरिकांचा जीव वाचावा यासाठी उदया पासून ऑक्‍सीजनचा प्‍लॅट सुरू करित असून दररोज 600 टाक्‍या भरून आरोग्‍य सेवेसाठी उपलब्‍ध करून दिल्‍या जातील असे ते म्‍हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post