पुण्यात आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक


पुण्यात आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक पुणे: पुण्यात रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. दहा स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्याची परवानगी महापालिकेने आरटीओकडे मागितली होती. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या दहा स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. या स्कूल बसचं भाडं प्रतिदिन 1600 रुपये आकारण्यात येणार आहे. कोरोनामुळे पुण्यातील मृतांची संख्या वाढली आहे. त्यातच रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने पालिका यंत्रणा मेटाकुटीला आली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post