अखेर पुण्यात ‘अंशत:’ लॉकडाऊन, अनेक निर्बंध लागू

अखेर पुण्यात ‘अंशत:’ लॉकडाऊन, अनेक निर्बंध लागू


पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार  यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.  पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

* सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

*मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद

* धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद

* PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

* आठवडे बाजारही बंद

* लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

* संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post