"हा'' आहे करोनावरील रामबाण उपाय, इंदोरीकर महाराज यांनी दिला खास मंत्र


मनाचा खंबीरपणा हाच करोनावरील रामबाण उपाय,  इंदोरीकर महाराज यांनी दिला खास मंत्र

 


लोणी : किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या इंदोरीकर अर्थात निवृत्ती महाराज देशमुख  यांनी कोरोनावर रामबाण उपाय सांगितलाय. कोरोन काळात हात धुणे, सँनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच आणखी एक उपाय सांगितलाय. मनाचा खंबीरपणा ठेवणे हा देखील रामबाण उपाय असल्याचे इंदोरीकर महाराज म्हणाले. आज लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते आले होते.  लोणी येथे भाजपाचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने साडे चारशे बेड्सच्या कोवीड सेंटरची सुरवात झालीय. सेंटरचे लोकार्पण ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर, ह.भ.प उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलातील भाषणातून, 'नागरिकांनो घाबरुन जावू नका' असं आवाहन केलंय. किर्तनकार इंदोरीकर यांच्याहस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. आताच्या कोरोनाच्या काळात अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. अशिक्षीत, सुशिक्षीत सर्वांनी कोरोनाचा धसका घेतलाय. त्यामुळे अनेकांना मृत्यू समोर दिसतोय. मात्र काळजी करत राहू नये असे इंदोरीकर महाराज म्हणाले.आजपर्यंत अनेक अवतार झालेत. मात्र माणसातील माणुसकी काय आहे ? हे दाखविण्यासाठी कोरोनाला याव लागलंय असे ते म्हणाले. तुमच्याबद्दल कोणाला किती आपलुकी आहे ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पॉझीटीव्ह व्हावं लागतंय असे निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले. 

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संवाद साधला व लवकरात लवकर या संकटातून सुटका करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व शासनाच्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post