...आणि पवारांनी मानले फडणवीसांचे आभार

आ.रोहित पवारांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

 


मुंबई: राज्यात कोरोना रुग्णंसख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाविकासआघाडी सरकारने लादलेले निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनला भाजपने पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यामध्ये रोहित पवार यांनी, तुम्ही उशीरा का होईना पण मदत केलीत, यासाठी आभारी असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं. केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला. याशिवाय, राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरजही रोहित पवार यांनी बोलून दाखविली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post