ऑक्सिजन निर्मीती प्लान्टच्या ठिकाणी संनियंत्रणासाठी आता सहा पथकांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. भोसले

 ऑक्सिजन निर्मीती प्लान्टच्या ठिकाणी संनियंत्रणासाठी आता सहा पथकांची नियुक्ती

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले आदेशअहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाहीसाठी दरदिवशी पावले उचलली जात आहेत. आज जिल्ह्यातील रुग्णांसाठी लागणारी ऑक्सीजनची गरज आणि उपलब्धता यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी ऑक्सिजनचा पर्याप्त वापर सुयोग्य पद्धतीने नियंत्रण करण्याकामी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील आदेश त्यांनी जारी केले. तसेच, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भोसले यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नोडल अधिकारी व रिफिलर प्लांटधारक यांची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात सूचना केल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनीआता जिल्ह्यातील ऑक्सीजनचा पर्याप्त वापर होण्यासाठी आणि जिल्ह्यातील ऑक्सीजन रिफीलर यांच्याकडून फक्त वैद्यकीय/औषधी कारणाकरिता ऑक्सीजनचा वापर व्हावायावर नियंत्रणासाठी आता पथकांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यातील अहमदनगर इंडस्ट्रीयस गॅस प्लान्टसाठी रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पल्लवी निर्मळ तर इनचार्ज ऑफिसर म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम आणि नायब तहसीलदार (नेवासा) डी.एम. भावले यांची नियुक्ती केली आहे.  या प्लान्टमधील ऑक्सीजन निर्मिती नियंत्रणासाठी तीन पथके कार्यरत असतील.

हायटेक एअर प्रोडक्टस (एमआयडीसीअहमदनगर)  येथील प्लान्टवरील ऑक्सीजन निर्मिती व नियंत्रणासंदर्भात रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उज्ज्वला गाडेकर आणि इनचार्ज ऑफीसर म्हणून तहसीलदार (पुनर्वसन) श्री. वारुळे आणि नायब तहसीलदार (गृह शाखा) राजू दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारितही तीन पथके कार्यरत असतील. यासंदर्भातसंबंधित पथकांना जबाबदारी  नेमून देण्यात आली आहे. या पथकांनी त्यांना दिलेल्या वेळेनुसार तेथे उपस्थित राहून संनियंत्रण करावयाचे आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निर्देशानुसारनिवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचित यांनी रिफीलर आणि नोडल अधिकारी तसेच जबाबदारी सोपविण्यात आलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.

ऑक्सीजन प्लांट परिसरात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेक जण ऑक्सीजन प्लांटच्या परिसरात गर्दी करतात. त्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊन सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो.  ही शक्यता लक्षात घेऊन संबंधित प्लांटच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आता ऑक्सीजन प्लांटमधून रुग्णालयांना वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजनचे नियमित वितरण केले जात आहे. या वितरण प्रक्रियेत सुव्यवस्था व सुरळीतपणा राहण्यासाठी ऑक्सीजन प्लांटच्या परिसरात रिपोर्टिंग ऑफिसरइन्चार्ज ऑफिसर यांच्यासह सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या दोन्ही प्लान्टच्या ठिकाणी दैनंदिन वितरण व्यवस्थेसाठी मंडलाधिकारी व अव्वल कारकून यांचा समावेश असलेली सहा पथके तैनात केली आहेत. ऑक्सिजन रिफिलर यांना ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या ऑक्सिजनच्या दैनंदिन नोंदी घेणेप्राप्त अक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणाकरिता वितरित होत असल्याची खातरजमा करणेऑक्सीजन रिफिलर यांचेकडून गैर वैद्यकीय कारणाकरिता ऑक्सिजन पुरवठा होत असल्यास आवश्यक ती कारवाई करणेऑक्सीजन रिफिलर यांचेकडून वितरण झालेल्या हॉस्पिटलच्या नोंदी ठेवणेतसेच उपलब्ध करून देण्यात आलेली ऑक्सिजनची मात्रा याबाबतही नोंदी ठेवणेरिफिलिंग प्लांट वरून निघालेला ऑक्सीजन वितरण करावयाच्या हॉस्पिटलला पूर्ण क्षमतेने प्राप्त झाल्याबद्दल खात्री करणे आदी कामे या पथकाकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यानश्री. निचित यांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या वेळी नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळउज्वला गाडेकरसहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदमतहसीलदार रोहिदास वारुळेनायब तहसीलदार अभिजित बारवकरराजू दिवानडी. एम. भावलेमंडलाधिकारी आरती आंधळेए. डी. पवारवाघमारेसंदेश दिवटेआशुतोष खेडकरभाऊसाहेब डमाळे आणि संबंधित  प्लान्टचे संचालक आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post