पंचायत समिती इमारतीच्या दुसर्‍या मजल्याच्या कामासाठी मिळणार ‘इतक्या’ कोटींचा निधी

 पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्यासाठी जिल्हा परीषदे मधून दोन कोटीचा निधी देणार -शेळकेनगर: पंचायत समिती मध्ये जागा अपुरी असल्यामुळे येथील विभाग दोन तीन ठिकाणी विखुरलेले आहेत . हे सर्व विभाग पंचायत समितीच्या आवारात आणणार . जिल्हा परीषदेच्या घसाऱ्यामधून दोन कोटी रुपायाचा निधी पंचायत. समितीत दुसरा मजला करण्यासाठी देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले .
पंचायत समिती च्या नूतन सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉ. दिलीस पवार याचा पदभार घेण्या  प्रंसगी ते बोलत होते . यावेळी माजी महापौर भगवान फुल सौंदर , संपत भाऊ म्हस्के,जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे , माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब हराळ , रामदास भोर ,नगरसेवक योगीराज गाडे , गटविकास अधिकारी सचिन धाडगे , माजी पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे, रविंद्र भापकर , व्ही. डि.काळे, गुलाब शिंदे , प्रकाश कुलट , निसार पठाण , चंद्रकांत खाडे, संदिप गुंड यावेळी उपस्थित होते .
  शेळके म्हणाले सध्या कोरोना चा काळ चालू आहे .कोरोना  धरून चालायचा आपल्या विकास कामात कुठेही अडचण येणार नाही . महाआघाडीचे सरकार आहे निधीची कमतरता पडणार नाही . सर्वांना समसमान निधी  दया . शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोंकापर्यत कश्या पोहचतील यां कडे लक्ष दया . सुरेखा गुंड म्हणाल्या पंचायत समिती च्या माध्यमातून सर्व सामन्य नागरिंकाचे प्रश्न सोडवले जातील .
पंचायत सामिती महा विकास आघाडी च्या ताब्यात सल्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही पवार म्हणाले कोरोना जरी असला तरी तुमच्या अडचणी सोडवल्या जातील . नगरला कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही . दुरध्वनी मार्फत नागरिकानी आपल्या अडचणी सांगीतल्या तरी चालेल . कमी कालावधी असला तरी जास्तीत जास्त नागरिकाचे प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवले जातील
डॉ. दिलीप पवार
उपसभापती पंचायत समिती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post