पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन नगर - सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रवरानगर येथील कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या स्मृती स्थळास माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिवादन केले. सहकार चळवळीची क्रांती निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.या माध्यतातून समाजात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडले. याप्रसंगी माजी मंत्री मा.श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. विश्वासराव कडू यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. तसेच लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने देखील अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post