पालकमंत्र्यांनी नगरला वार्‍यावर सोडून दिलेय, माजी मंत्री पाचपुतेंची टिका

 पालकमंत्र्यांनी नगरला वार्‍यावर सोडून दिलेय, माजी मंत्री पाचपुतेंची टिकानगर : जिल्ह्यात करोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, इंजेक्शन मिळत नाही. लोकांचे आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून फोन येतातय. मंत्री निष्क्रिय आहेत. परिस्थिती हाताळण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे. नगरचे पालकमंत्री तर नगरला फिरकायला तयार नाहीत. प्रशासन काम करीत आहे, पण पालकमंत्री पूर्णवेळ नसल्याने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत होत नाहीय. पालकमंत्री नगरमध्ये आले तर टूरवर आल्यासारखे येतात व जातात. त्यांनी सगळ्या नगरला वार्‍यावर सोडून दिले आहे. करोना उपाययोजनांची जिल्ह्यात अतिशय दयनीय व विदारक अवस्था आहे, अशी टिका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली आहे. नगरमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टिका केली. मी सुध्दा पालकमंत्री होतो असेही त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post