जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मदत केंद्रामुळे अत्यवस्थ रुग्णाला मिळाला O2 बेड....


जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मदत केंद्रामुळे अत्यवस्थ रुग्णाला मिळाला O2 बेड.... अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र ब. भोसले यांनी 'कोवीड बेड'च्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास 'मदतकेंद्र' सेवा सुरू केल्याबद्दल त्यांच्यासह संपूर्ण टीमचे ऑल इंडिया युथ फेडरेशन, अहमदनगरच्या वतीने जाहीर आभार.


    रात्री बारा वाजता फोन आला. आम्ही साईदीप हॉस्पिटल जवळ उभे आहोत, आम्हाला 'ओटू बेड'ची अत्यंत गरज आहे. साईदीपमधे बेड शिल्लक नाही. आपण आम्हाला मदत करा.


    मी सरळ कलेक्टर ऑफिसच्या हेल्पलाइन नंबर ०२४१-२३४५४६० येथे फोन लावला. मनात विचार आला रात्रीचे बारा वाजले आहेत, फोन लावणे योग्य राहील का? पण रिंग वाजली आणि फोन उचलला गेला. मी म्हणालो सर एक ओटु बेड अर्जंट पाहिजे. त्या सरांनी लिस्ट चेक केली आणि सांगितलं. गॅलेक्सी हॉस्पिटलला १२ बेड शिल्लक आहेत पण त्यांचा फोन लागत नाही मी नंबर देतो तुम्ही प्रयत्न करा. नंबर लावला फोन नॉट रीचेबल होता. मी पेशंटच्या नातेवाईकांना फोन लावला म्हणालो गॅलेक्सी हॉस्पिटलला बेड आहे, तुम्ही तिथे जा. तिथे गेल्यानंतर रिसेप्शनवर विचारले असता ते म्हणाले एक  बेड शिल्लक आहे पण ते बेड अर्ध्यातासापूर्वी बुक झाला आहे. मला फोन आले ते म्हणाले बेड आहे पण बुक आहे. मी म्हणालो त्यांच्याशी बोलणं करून द्यावा. मी म्हणालो पेशंट ची कंडीशन खराब आहे तुम्ही सहकार्य करून पेशंटला बेड द्यावा. ते म्हणाले पंधरा मिनिट थांबा व्यवस्था करतो. पंधरा मिनिटानंतर नातेवाईकांचा फोन आला बेड भेटले.


यामधे सर्वप्रथमत: तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी माननीय डॉ.राजेंद्र ब. भोसले यांचे आभार!  कारण बेडची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती मिळाली नसती तर बेड ही मिळाली नसती.

  जिल्ह्यातील रूग्णांना या गंभीर काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील मदतकेंद्राचा चांगला हातभार लागत आहे.


फिरोज चांद शेख

ऑल इंडिया यूथ फेडरेशन अहमदनगर.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post