चक्क शिवसैनिक करणार फडणवीसांचा जाहीर सत्कार, दाखवून द्या ‘फडणवीस’ पॅटर्न

 


चक्क शिवसैनिक करणार फडणवीसांचा जाहीर सत्कार, दाखवून द्या ‘फडणवीस’ पॅटर्नठाणे: महाराष्ट्रातील करोनाचे वाढते संकट पाहता विरोधी पक्ष सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टिका करीत आहे. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आघाडीवर असून फडणवीसांना ठाणे जिल्ह्यातील एका सर्वसामान्य शिवसैनिकाने फेसबुक पोस्ट लिहून आव्हान दिले आहे. ही पोस्ट समाजमाध्यमांत चांगलीच व्हायरल झाली आहे. फडणवीसांनी हे आव्हान पूर्ण केल्यास डोंबिवलीतील आप्पा दातार चौकात जाहीर सत्कार करण्याचा शब्दही राजेश कदम यांनी दिला आहे.


’देवेंद्र फडणवीस साहेब, दाखवून द्या फडणवीस पॅटर्न...’ अशा शीर्षकाची ही पोस्ट आहे. 

या पोस्टमध्ये राजेश कदम म्हणतात... ’आपल्या लाडक्या विदर्भातील नागपूर शहर तुमच्या हातात आहे. तिथं भाजपची सत्ता आहे. बाकी जिथे जिथे तुमची सत्ता आहे, वर्चस्व आहे त्या शहरांचं नंतर बघू. पण आजघडीला नागपूरमध्ये  हजार क्टिव्ह करोना रुग्ण आहेत. रोजच्या रोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडतेय. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरीट सोमय्या, छोटे राणे बंधू, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये ह्या तुमच्या सर्व करोना तज्ज्ञांना नागपूरमध्ये घेऊन जा. गरज भासल्यास इतर छोट्या मोठ्या पक्षातील जे अनेक तज्ञ आहेत, ज्यांचा करोनावर प्रचंड गाढा अभ्यास आहे, त्या सर्वांना सोबत घ्या आणि नागपूरमध्ये करोना संक्रमणावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत. रेल्वे, देऊळ, बस, दुकाने, फेरीवाले व इतर सर्व अस्थापना हे बंद न करता म्हणजेच, लॉकडाऊन न करता करोना रोखण्याच्या  आयडिया आहेत. विशेषतः तुमच्या मोदी सरकारची सुद्धा मदत घ्या आणि दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवून आणतो ते!’ ’नागपुरातील करोनावर तुम्ही नियंत्रण मिळवलंत तर राज्य सरकार, मुंबई महापालिका अभिमानानं जसं ’धारावी पॅटर्न’ बद्दल सांगते, तसंच आम्ही सुद्धा ’फडणवीस पॅटर्न’ म्हणून तुमचं कौतुक करू. साहेब महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करताना दिसत आहात, अहो सत्ता काय येते जाते, तुमची सत्ता जाईल असं कोणाच्याच स्वप्नातही नव्हतं, पण ती गेली. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस करोनाच्या भयंकर विळख्यात आहे, करोना विषाणू बघत नाही हा भाजपचा आहे की शिवसेनेचा? त्यामुळं तोंडाच्या वाफा चालवण्यापेक्षा, विरोधात बोलण्यापेक्षा खरंच महाराष्ट्राचे एक लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर खरोखरच तुमचा डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध आप्पा दातार चौकात, म्हणजेच फडके पथावर भव्य दिव्य सत्कार ठेवू.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post