2 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विनामूल्य ऑनलाईन ध्यान कार्यक्रम

 2 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विनामूल्य ऑनलाईन ध्यान कार्यक्रम सहजयोग ध्यानसाधने ला 51 वर्षे पूर्ती निमित्ताने प्रतिष्ठान, पुणे यांचे वतीने 2 मे 2021 रोजी  सायं 5वा. विनामूल्य ऑनलाईन आत्मसाक्षात्कार आणि ध्यानसाधने चा जाहीर कार्यक्रम 


सहज योगाच्या प्रणेत्या प. पु. श्रीमाताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी ठाणे जिल्ह्याच्या सीमेजवळील नारगोल (गुजरात) येथे समुद्रकिनारी ध्यानस्थ अवस्थेत जाऊन सहस्रार चक्र भेदनाची आणि विनासायास आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची पद्धत - सहजयोग ध्यान सुरु केली. या घटनेला 51 वर्षे पूर्ण होत आहेत . प्रत्येक मानवाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊन जीवनात परिवर्तन यावे आणि जीवन आनंदी व्हावे हे श्री माताजींचे स्वप्न होते . त्या करिता त्या विश्वभर फिरल्या आणि सहजयोग ध्यान, भारतीय संस्कृती, कला, भारतीय जीवन पद्धती  आणि दैवीय ज्ञाना चा प्रचार त्यांनी केला . या निमित्ताने सहजयोग संस्थेद्वारे  प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने  रविवारी 2 मे  रोजी सायं 5 वा learning sahajayoga या युट्युब चॅनेल द्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.  लॉकडाऊन च्या काळात लाखो साधकांनी लाभ घेतला आहे . सद्याच्या काळात मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सहजयोगा ध्यान सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे . 

       सदर कार्यक्रमासाठी  विनामूल्य टोल फ्री क्रमांक 1800 2700 800 यावर रजिस्टर करावे असे आवाहन सहजयोग संस्थे द्वारे केले आहे.

सहजयोग ध्यान साधना सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून दैनंदिन 10 मिनिटे ध्यानाने प्रत्येक व्यक्ती आपल्यात परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दैनंदिन कामासाठी  लागणारी ऊर्जा , मानसिक  सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सहजयोग ध्यान धारणा अत्यंत प्रभावी आहे. सध्याच्या अस्थिर व बिकट परिस्थितीत सहजयोग ध्यान निशुल्क ऑनलाईन कार्यक्रम शहरांत आणि संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरत आहे. साधकांना घर बसल्या सहज ध्यान शिकविण्यासाठी दररोज सायं 5 वा  learning sahajayoga व www.youtube.com/c/le या लिंकवर व युट्युब चॅनेल द्वारे विनामूल्य कार्यशाळा 20 जून पर्यंत घेतल्या जाणार आहे .

सदर लाईव्ह विनामूल्य ध्यान प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराचे वतीने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post