आपसी आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेची नोंद ही मूळ सेवापुस्तकात होणार

 


आपसी आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेची नोंद ही मूळ  सेवापुस्तकात होणार -राजेंद्र निमसे

अहमदनगर जिल्हा परिषदेचे २० एप्रिल २०२१ चे निर्देश


अहमदनगर :आपसी आंतर जिल्हा बदलीने अहमदनगर जिल्ह्यात रूजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना  शासन परिपत्रकानुसार दोघांपैकी सेवाकनिष्ठ असणाऱ्या प्राथमिक शिक्षकाची सेवाजेष्ठता गृहीत धरून तशी नोंद संबंधित शिक्षकांच्या मूळ सेवापुस्तकात होणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर यांनी दिली.


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे ,अखिल पदवीधर शिक्षक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी मा . गुलाब सय्यद, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी मा . रमजान पठाण, प्राथमिक शिक्षक अधिक्षक मा . प्रदीप शिंदे यांची जिल्हा परिषदेमध्ये समक्ष भेट घेऊन ५ एप्रिल २०२१ रोजीच यासंदर्भात सखोल चर्चा करून निवेदन दिले होते.महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम१९६७ मधील ८(२ ) व  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे  २८ जानेवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार  अशा प्रकारच्या विषयाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची पूनश्च संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती .तसेच याच आशयाचे निवेदन मा . प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा  चेअरमन, जिल्हा शिक्षण समिती व मा.राजेंद्र क्षिरसागर,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अहमदनगर यांनाही देण्यात आले होते .


आता  या विषयावर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या २० एप्रिल २०२१ च्या पत्रानुसार कार्यवाही झाली असून आपसी आंतर जिल्हा बदलीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या मूळ सेवा पुस्तकात नियमानूसार त्यांच्या सेवाजेष्ठतेची नोंद घेतली जाणार असून सन२०२१ मध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्या मध्ये संबंधित शिक्षकांची करंट मॅनेजमेंट डेट ही शाळा लॉगिन मधून अदययावत करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले असून या संबंधित शिक्षकांना भविष्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये होणाऱ्या विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नत्या, पदवीधर वेतनश्रेणी व जिल्हांतर्गत बदल्या आदीं बाबींमध्ये खूप मोठा लाभ होणार आहे.


अहमदनगर जिल्हा परिषदेच्या या  निर्देशाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव , राज्य संघटक राजेंद्र निमसे यांचेसह  संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय परहर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, अखिल डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव, जि.कार्या चिटणीस प्रदीप चक्रनारायण, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, विष्णू बांगर, राजकुमार शहाणे,विलास लवांडे , ज्ञानदेव कराड, सुधीर रणदिवे, मधुकर डहाळे, महेश लोखंडे, लाजरस कसोटे, संजय सोनवणे, ज्ञानदेव उगले, प्रकाश पटेकर , संजय मोटकर, मधुकर थोरात, संदीप शेळके ,नंदू गायकवाड, बथुवेल हिवाळे दिपक सरोदे,पांडुरंग देवकर, प्रविण शेळके, अशोक दहिफळे, आदिनाथ पोटे, संजय कांबळे, विनायक गोरे, अमोल मुरकुटे, आदिल शेख, राजेंद्र गांगर्डे, राहुल व्यवहारे, विशाल कुलट, रविंद्र दरेकर , जनार्दन काळे, बाळासाहेब जाधव, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ,लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, दत्ता बर्गे, प्रकाश कदम, रविंद्र अनाप, शिवाजी नरवडे,संभाजी तुपेरे, शहाजी जरे, संदीप कडू, दत्तात्रय काळे, शिवाजी माने, नवीन कुमार वागजकर , सुधीर बोऱ्हाडे, राजेंद्र देशमुख, सुखदेव डेंगळे, दिलीप दहिफळे,राजेंद्र सुतार व जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, संगीता निगळे, मनिषा गोसावी, बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, उज्ज्वला घोरपडे, मनिषा क्षेत्रे, सुरेखा बळीद, सविता नागरे, वर्षा शिरसाठ , वसुंधरा जगताप यांचे सह आपसी आंतर जिल्हा बदली होऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये रुजू झालेले प्राथमिक शिक्षक  सोमनाथ पिंपळे, बंडू नागरगोजे,अशोक शिंदे, ईश्वर जाधव, रविंद्र चव्हाण, दुळाजी देवकाते, शशिकांत  खाकाळ, रवींद्र सुपेकर ,अमोल थिटे, दिलीप शिंदे, किशोर टकले विक्रम पवार ,पोपट तुपसौंदर, भाऊराव भांगरे, प्रताप नरवडे ,आबासाहेब टकले, भाऊसाहेब काळे यांनी स्वागत केले आहे .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post