कोरोनाला रोखण्यासाठी निंबळक गावात रोग प्रतिबंधक औषध फवारणी

 कोरोनाला रोखण्यासाठी निंबळक गावात रोग प्रतिबंधक औषध फवारणी निंबळक: - निंबळक( ता. नगर ) येथे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव   रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या व तीने गावात    रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली. येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे संपुर्ण गावात फवारणी करणार असल्याचे सरपंच प्रिंयका लामखडे यांनी सांगीतले . गावात सकाळी ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करण्यात आली .सरपंच प्रियंका लामखडे , उपसरपंच बाळासाहेब कोतकर सह  ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन फवारणी केली . गावात बहुतेक दुकाने वेळत बंद करत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतला  आल्या असून सर्व व्यवसाईकांना प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे . अन्यथा ग्रामपंचायतच्या वतीने कार्यवाही केली जाईल असे लामखडे यांनी सांगीतले . स्वतःची काळजी , विनाकारण घराच्या बाहेर पडू नका , मास्कचा वापर करा . ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी . कोरोनाची लागण झाली असेल तर कोवीड सेंटरला उपचार घ्यावा ..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post