शेवगावमध्ये राजळेंच्या पुढाकाराने लोकनेते गोपीनाथजी मुंडे कोविड केअर सेंटर, दिव्यांगांसाठी बेड राखीव

 शेवगावमध्ये राजळेंच्या पुढाकाराने लोकनेते गोपीनाथजी मुंडे कोविड केअर सेंटर, दिव्यांगांसाठी बेड राखीवशेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रयत्नातून शेवगाव व परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज आपल्या आदि फाउंडेशन च्या वतीने  स्वामी समर्थ मंगल कार्यालय पाथर्डी रोड, शेवगाव येथे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवायुक्त 100 खाटांचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब कोविड केअर सेंटर चे  उदघाटन जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.


                     यावेळी पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार अर्चना पागिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, डॉ. नीरज लांडे, डॉ. विजय फलके, डॉ. विजय लांडे, डॉ. सुरज सुसे, डॉ. विजय लांडे, भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसन मोर्चा सदस्य बापूसाहेब पाटेकर,  महिला तालुका अध्यक्षा आशाताई गरड, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस रोहिणीताई फलके,  भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील रासने, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक गणेश कोरडे, सागर फडके, दिगंबर काथवटे,  वाय. डी. कोल्हे, नितीन मालानी, अमोल घोलप, संदीप खरड, कैलास सोनवणे, रामकिसन तापडिया, गंगा खेडकर, सुभाष बडधे, महादेव पवार, नवनाथ कवडे, प्रा. कल्याण देवढे, मच्छिद्र बर्वे, बाळासाहेब झिरपे, हरिष शिंदे मुरकुटे सर, दत्ताभाऊ भराट, अनिलराव वडागळे आदि कार्यकर्ते सुरक्षित अंतर  ठेऊन कोरोना नियमाचे पालन करीत उपस्थित होते.


              या कोविड केअर सेंटर चे खास वैशिष्ट्य म्हणजे कोरोना महामारीमध्ये दिव्यांग व्यक्तीची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व गोष्टींची खबरदारी घेत दिव्यागांसाठी  30 खाटांची सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. 


      या सेंटर मध्ये रुग्णाची सगळी व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.  तरी गरजूनी सर्व नियम पाळून या कोरोना सेंटर चा फायदा घ्यावा व कोरोनवर मात करावी. 


        सध्या ची परिस्थिती खूप भयावह झालेली आहे. मात्र खचून न जाता धर्याने या महामारीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. रुग्णालयात सध्या जागा मिळत नाही मग या परिस्थितीत रुग्णाची होणारी गैरसोय पाहता जनतेसाठी कोरोना सेंटर सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. 


          प्रत्येक वेळी मी सगळ्याच्या आनंदात सहभागी असते मग संकटांच्या वेळी सुद्धा डबल ताकतीने मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.  त्यामुळे खचून न जाता मोठ्या हिमतीने आपण या कोरोना रुपी जागतिक महामारी वर मात करू.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post