राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी


 राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी तर पक्षाच्या सर्व विधिमंडळ व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण 2 कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निधीचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post