जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर

जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर नाशिक: नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कारवाई केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कोरोना उपाययोजनांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.नाशकात रुग्णसंख्या वाढत असतांनाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपाययोजनांबाबत केलेली दिरंगाई आणि गलथान कारभाराप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नसतांना जिल्हा रुग्णालयातील 80 पैकी केवळ 7 व्हेंटिलेटर वापरात असल्याची बाब समोर आली.आढावा बैठकीत धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे संताप व्यक्त केला. त्यानंतर तासाभरातचं जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post