धुरामुळे आरोग्याचे प्रश्न....अमरधाममधील कोविड मयतांचे अंत्यविधी थांबवा, नालेगाव ग्रामस्थांची मागणी

 नालेगाव अमरधाम येथे होत असलेल्या कोविड अंतविधी ताबडतोब थांबवा- नालेगाव ग्रामस्थांची मागणीधुरामुळे निर्माण होतोय स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न -अजय चितळे

अहमदनगर प्रतिनिधी- नालेगाव अमरधाम हे मध्यवर्ती शहराच्या लगत असल्या मुळे येथे होत असलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यविधी मुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्यामुळे  कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात दररोज मोठी वाढ झाल्यामुळे नालेगाव अमरधाम येथे मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होत असल्यामुळे नालेगाव गावठाण, सुडकेमळा, बागरोजा हडको, दिल्लीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रोड परिसर, ठाणगे मळा या परिसरासह दाट लोकवस्ती आहे. या कोरोना रुग्णांची अंत्यविधी मुळे मोठ्याप्रमाणात धुराचे साम्राज्य याठिकाणी निर्माण होते. त्यामुळे अमरधाम च्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिकेने कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी ही जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच नालेगाव अमरधाम येथे फक्त कोविड रुग्णांचा अंत्यविधी सोडून इतर अंत्यविधी या ठिकाणी करावे अशी मागणी नालेगाव ग्रामस्थांनी केली. दररोज सुमारे 60 ते 70 कोरोना रुग्णांचा मृतदेहांचा अंत्यविधी एकाच वेळेस या ठिकाणी केला जातो ही परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. सावेडी अमरधाम येथे सर्व कोरोना बाधित रुग्णांचा अंत्यविधी करावा कारण या ठिकाणी आजूबाजूस दाट लोकवस्ती नाही अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी नगरसेवक अजय चितळे, नगरसेवक शाम नाळकांडे,नगरसेवक गणेश कवडे,संतोष लांडे, वैभव वाघ,राम वाघ,विकी वाघ,गणेश कुलथे, दीपक घोडेकर,सागर कदम,सचिन मूदगल,सनी आगरकर,सुनील दाते,अमोल कवडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post