श्रीगोंद्यात नागवडे कारखाना व शिवाजी महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत

 श्रीगोंद्यात नागवडे कारखाना व शिवाजी महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीतश्रीगोंदा : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंदा तालुक्यात नागवडे कारखाना व शिवाजी महाविद्यालयाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. तसेच अधिका-यांची बैठक घेऊन श्रीगोंदा शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार डॉ.सुधीर तांबे, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, सभापती अनुराधा नागवडे आदिंसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post