नगर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन...ग्रामस्थांचा प्रतिसाद

 


नगर तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन...ग्रामस्थांचा प्रतिसादनगर : राज्य शासनाने जारी केलेल्या विकेंड लॉकडाऊनला ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळाला. नगर तालुक्यातील गावांमध्ये कडकडीत लॉकडाउन पहायला मिळत आहे. प्रमुख राज्य मार्गांवर असलेल्या गावातही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. रस्त्यांवर चिटपाखरुही फिरताना दिसून येत नाही. पोलिस तसेच प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. नगर तालुक्यात गेल्या काळात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे जमावबंदीलाही चांगला प्रतिसाद मिळत असून शनिवारपासूनच्या संचारबंदीचेही ग्रामस्थांकडून काटेकोर पालन होताना दिसून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post