मी फक्त जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींना उत्तर देईल, इतरांना नाही : खा.डॉ.सुजय विखे

मी फक्त जिल्ह्यातील जनता व  लोकप्रतिनिधींना उत्तर देईल, इतरांना नाही : खा.डॉ.सुजय विखे नगर-  गेल्या आठवड्यात डॉ. विखे यांनी दिल्लीहून एका खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर शंका घेणारे ट्विट चाकणकर यांनी केले होते. ‘सध्या जनता सैरभर झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेची चेष्टा करू नये. त्यामुळे विखे यांनी ज्या पद्धीने इंजेक्शन्स आणल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला, त्याच पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे,’ असे चाकणकर यांनी म्हटले होते. कर्जत तालुक्यातील आढावा दौऱ्याच्यावेळी बोलताना विखे यांनी चाकणकर यांचे नाव घेता आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. विखे म्हणाले, ‘नगर जिल्ह्याने विखे कुटुंबियांना पन्नास वर्षे साथ दिली आहे. आम्ही फसवाफसवी केली असती तर लोकांनी आम्हाला अशी साथ दिली नसती. सध्या रेमडेसिविर बाबत जे राजकारण सुरू आहे, त्यामध्ये माझी जबाबदारी ही केवळ नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. मी जे काय उत्तर द्यायचे ते त्यांना देईल. या जिल्ह्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी विचारले तर मी त्यांना उत्तर देईल. जिल्ह्बाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुळात मी जो व्हिडिओ प्रसारित केला, त्यातच सर्व स्पष्ट केले आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईल. किती इंजेक्शन्स आणली याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे मी कोठे गेलो होतो, काय केले, त्या बॉक्समध्ये काय आणले, याबद्दल कोणीही टिप्पणी करू नये. ज्यांना शंका आहे, त्यांनी थेट बोलावे, मी व्यक्तीश: उत्तर देईन. मात्र, माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्यापुरती आहे,’ असेही विखे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post