जिल्हा प्रशासन करोनाची परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणेल, खा.विखेंना विश्वास

जिल्हा प्रशासन करोनाची परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणेल, खा.विखेंना विश्वास


नगर- नगरचे खा.सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोरोना संबंधित निर्बंध तसेच औषधांचा तुटवडा, ट्रीटमेंटचे पॅकेजेस याबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

योग्य नियोजन करून अहमदनगर जिल्हा प्रशासन कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणेल आणि नागरिकांची या संकटातून लवकरच सुटका होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर बैठक अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर भोसले आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला अहमदनगर शहराचे प्रख्यात खाजगी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर्स, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरडीसी आणि महसूल प्रशासनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post