आरोग्य व्यवस्थेबाबत उत्तर व दक्षिण नगर जिल्ह्यात विभाजन करावे : खा.सदाशिव लोखंडे

 शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर चालू करणे बाबत खासदार सदाशिव लोखंडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन 

नगर येथे पत्रकार परिषद घेऊन केली मागणी  नगर- शिर्डी लोकसभा मतदार संघात व आमच्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्नाची मोठी संख्या आहे ,देशातील पहिल्या दहा कोरोना बाधित जिल्ह्यामध्ये अहमदनगर चा समावेश आहे ,अनेक रुग्ण बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू पावलेले आहे .महाराष्ट मधील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे .काही तालुक्याच्या ठिकाणहून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी बरेच अंतर पार करावे लागते ,त्यात तालुका ते जिल्हा मध्यतंरी ऑकसीझन व व्हेंटीलेटर ची सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्ण रस्त्यातच गतप्राण होत आहेत. 

सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. शिर्डीत ऑक्सिजन बेडसह जंम्बो कोविड सेंटर सुरु झाल्यास उत्तर नगर जिल्ह्यातील अत्यवस्थ रूग्णांचे नगरमध्ये येण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे किमान आरोग्य व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी उत्तर व दक्षण जिल्हा असे विभाजन करावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
नगर जिल्ह्यातील शिर्डी हे अतिशय महत्वपूर्ण ठिकाण असून जिल्ह्यातील अकोले ,संगमनेर ,कोपरगाव,राहता ,श्रीरामपूर ,राहुरी ,व नेवासा हे सात तालुके व नाशिक जिह्यातील सिन्नर ,येवला त्याचप्रमाणे ओरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुका शिर्डी लगत आहे . 
शिर्डी येथे साईबाबा विश्व्स्त व्यवस्था मंडळ यांचे सहाशे बेड चे सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल असून शिर्डी शहरातील अतिशय प्रशस्त अशा १०हजार हॉटेल्स रूम तसेच शेती महामंडळाची देखील जागा उपलब्ध आहेत ,शिर्डी देवस्थानकडे दररोज १ लाख लोकांची जेवणाची व्यवस्था होऊ शकते ,त्यासाठी देवस्थानकडे नियमित कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे . 
शिर्डी येथे २ हजार  ऑकसीजन बेड व २०० आय सी यु बेडचे जम्बो कोविड सेंटर चालू केल्यास जिल्हा रुग्णालय वरील ताण कमी होऊन कोविड रुग्णांना चागले उपचार होऊ शकतात .शिडी  देवस्थानकडे दररोज १०लाख लोकांची जेवणाची व्यवस्था होऊ शकते . बी.के.सी मुबई येथील जम्बो कोविड सेंटर चे प्रमुख डॉ ढेरे शिर्डी परिसरात असल्यामुळे ते सदर कामी मार्गदर्शन व मदत करण्यास तयार आहेत .त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच होईल .श्री साईबाबा विश्वस्त मंडळ शिर्डी ,अनेक साईभक्त असणारे उदयोगपती परिसरातील डॉकटर्स व एन जी व हे जम्बो कोविड शिर्डी येथे चालू करण्यास मदतीस तयार आहेत . 
तरी जिल्ह्यातील कोरोनाची भयावह परिस्थिती लक्षात घेता कोरोना रुग्नाच्या उपचारासाठी व सामान्य नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी तातडीने शिर्डी येथे जम्बो कोविद सेंटर उभे करणेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे. 
नगर येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी हि माहिती दिली.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते ,माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,संजय शेडगे ,सुमित नलावडे आदी उपस्थित होते 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post