महापालिकेत मोठी राजकीय घडामोड...सभागृहनेतेपदी भाजपच्या रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती

 


नगर महापालिकेत मोठी राजकीय घडामोड...सभागृहनेतेपदी भाजपच्या रवींद्र बारस्कर यांची नियुक्तीनगर : नगर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने खांदेपालट केली असून सभागृह नेतेपदावरुन मनोज दुलम यांना अवघ्या काही महिन्यातच हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी भाजपच्याच रवींद्र बारस्कर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. दुलम यांची काही महिन्यांपूर्वीच सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. मात्र आता अचानक त्यांच्या जागी बारस्कर यांची नियुक्ती करण्यात आल्याने पालिकेच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post