बाजार समितीच्यावतीने मेहकारी येथे कोवीड केअर सेंटर

 मा.खा.कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मेहकारी येथे कोवीड केअर सेंटर सुरूकोविडची जबाबदारी प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडावी- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेनगर - कोरोना विषाणूचे भयंकर संकट आपल्यावर आले असून यामध्ये अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहे. या विषाणूला थांबवण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांनी तपासणी केल्यानंतर हा आजार अंगावर न काढता प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे. काहीजण कोरोना बाधित असताना गावभर फिरत असतात त्यामुळे या विषाणूची इतरांनाही लागण होते व रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन मा.खा.कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नगर तालुक्यातील वाळुंज व मेहकर येथे सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू केले आहे. माजी मंत्री व आ.बबनराव पाचपुते यांच्या निधीतून या दोन्ही कोविड सेंटरला ऑक्सिजनयुक्त 20-20 बेड ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे असून प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

      मा.खा.कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नगर तालुक्यातील मेहकारी येथे कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ माजी मंत्री व आ. बबनराव पाचपुते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले समवेत तहसीलदार उमेश पाटील, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे,उपसभापती संतोष मस्के,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले,भाजप तालुक्यात अध्यक्ष मनोज कोकाटे,संचालक बाबासाहेब खरसे,रेवन चोभे,सरपंच संतोष पालवे, राम पानमळकर, डॉ.मांडगे, बन्सी कराळे,दीपक लांडगे,राजू लांडगे,संभाजी पालवे, अभय भिसे,सचिन सातपुते, संजय काळे,जयसिंग भोर आदी उपस्थित होते.

         यावेळी बोलताना आ.बबनराव पाचपुते म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना कोरोनाला बरोबर घेऊन चालायचे आहे यासाठी प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. माझ्या वैयक्तिक आमदार निधीतून नगर तालुक्यामध्ये वाळुंज व  मेहेकरी या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त बेड सुरू करण्यासाठी तहसीलदार पाटील यांना पत्र दिले असून तातडीने ऑक्सिजनयुक्त बेड लवकरच सुरू होणार आहे.

          
        यावेळी बोलताना तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की, कोरोनाचा या लढाईत प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून, मोठ्या प्रमाणात सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात गरज भासत असून यावर काम करणे गरजेचे आहे यासाठी प्रशासन पातळीवर नियोजन केले जात आहे. 

             अभिलाष घिगे म्हणाले की, बाजार समितीच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यामध्ये दोन कोवीड सेंटर उभे केले आहे. चांगल्या दर्जाचा आहार व औषधे येथे घेत असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान पुरवले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे असे ते म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post