केडगाव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने केडगाव आरोग्य केंद्र येथे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

 केडगाव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने केडगाव आरोग्य केंद्र येथे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
केडगाव जागरूक नागरिक मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका केडगाव आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आणि पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देऊन मदत केली आहे, याठिकाणीची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्वयंसेवकाची नेमणूक देखील केली आहे तर मंचाने आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरला देखील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मदत केली आहे तसेच येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना आणि नागरिकांना सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.यावेळी मंचाचे ज्येष्ठ सदस्य किशोर पाटील ,मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे, गणेश पाडळे ,जालिंदर शिंदे ,शुभम पाचारणे ,प्रवीण पाटसकर ,अक्षय शिंदे ,विशाल सकट यांसह मंचाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post