दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करुन 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न

 दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करुन 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मुंबई : सुरक्षित भविष्यासाठी बचत करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक जण बचत म्हणून नेहमीच एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हाला जोखीम नसलेल्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तर एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करुन 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळवू शकता. विशेष म्हणजे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पैसे मिळतात. एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी ही एक Endowment योजना आहे. यामध्ये लाईफ कव्हरबरोबरच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळते. या योजनेत 3 महिन्यांच्या लहान बाळापासून 55 वर्षांपर्यंतचे लोक गुंतवणूक करु शकतात. या योजनेअंतर्गत 100 वर्षांपर्यंत कव्हरेज मिळतं. तसेच पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याची एकरकमी रक्कम मिळेल.या पॉलिसीअंतर्गत गुंतवणूकदारांना 15, 20, 25 किंवा 30 वर्षे गुंतवणूक करू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post