जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक लाचप्रकरणी ‘एसीबी’च्या जाळ्यात

8 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक अधिक्षकाला रंगेहात पकडले

 


लातूर-  लातूर जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयातील सहाय्यक अधिक्षकाला 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अभिमन्यू धोंडीबा सुरवसे असे सहाय्यक अधिक्षकाचे नाव आहे.

तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या उपचाराचे वैद्यकीय देयक रक्कम 3 लाख 12 हाजर 564 रुपये काढण्यासाठी तांत्रीक मंजूरीची आवश्यकता होती. त्यासाठी आरोपीने शासकीय शुल्का शिवाय 5 टक्के रक्कम लाच म्हणून मागितलेली होती. तडजोडीनंतर 8 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम स्वत स्वीकारल्यानंतर अभिमन्यू सुरवसे याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उपअधिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post