पाथर्डीत  कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ

  पाथर्डीत  कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ
पाथर्डी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांची बळी गेले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर शासनाने दिलेले नियम पाळले पाहिज.परंतु कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सर्वांचीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी धावपळ सुरू आहे.
पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस टोचून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सकाळपासून गर्दी केली होती. पहाटे सहा वाजल्यापासून लोकांनी लस घेण्यासाठी नंबर लावले होते. वयोवृद्ध पासून तरुण लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते.कोरोनाच्या लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात असल्याने प्रथम येणाऱ्या लोकांना लस मिळत आहे. हजर असलेल्या लोकांना टोकन देऊन त्यांनाच प्राधान्याने लसीकरण केले जात आहे.लसीकरणाच्या वेळेस रांगेत असलेल्या लोकांमध्ये अचानकपणे येणारे लोक घुसत असल्याने मोठा गोंधळ उडत असतो, परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सामाजिक क्षेत्रात  काम करणारे कार्यकर्त्यांची मदत होते. यामध्ये आधार सेवाभावी संस्थेचे मुकुंद लोहिया,अमोल गर्जे व मुकुंद गर्जे मित्र मंडळ,अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचे अनिल हरेर,शहनवाज शेख,सुवर्णयुग मंडळाचे अभय गांधी,मोनिष उदबत्ते,शाहरुख शेख,दीपक भागवत, राहुल भगत,माऊली नरवणे आदी कार्यकर्ते पूर्णपणाने लसीकरणास आलेल्या लोकांना सेवा देत आहे.यामध्ये ऑनलाईनसाठी मदत करणे,लसीचा किती साठा उपलब्ध आहे, लसीचा कितवा ढोस आहे.अशा बारीक सारीक गोष्टीची माहिती देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मदतही केली जाते.आपल्या जवळचे कुटुंबातील माणसे चालता बोलता निघून चालली आहेत. रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक आजूबाजूची परिस्थिती पाहून हवालदिल झाले आहेत. दररोज सोशल मिडिया, वर्तमानपत्र, आणि टीव्हीच्या बातम्यातून अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला आहे.असे चित्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी लोक झजावत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post