निंबळक येथील माजी सरपंच विलासराव लामखडे यांचे निधन

 निंबळक येथील माजी सरपंच विलासराव लामखडे यांचे निधन अहमदनगर : - निंबळक ( ता. नगर ) येथील माजी सरपंच विलासराव लामखडे ( वय -६० )यांचे हदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले . त्यांच्या पश्चात वडील, पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , एक भाऊ, एक बहिण असा परीवार आहे . जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांचे ते धाकटे बंधू, अजय लामखडे याचे वडील , सरपंच प्रिंयका लामखडे यांचे सासरे होते . लामखडे यांनी दहा वर्ष सरपंच पद भूषविले . या काळात मीटर पध्दतीने पाणी योजना यशस्वी पणे राबविली . तसेच गावाला स्वच्छते विषयी पुरस्कार हि मिळवून दिले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post