प्रवाशांना गाडीत बसवुन लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

 रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसवुन मारहाण व लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

                                                                               छाया सौजन्य : विक्रम बनकर

नगर: दिनांक ३/४/२०२१ रोजी फिर्यादी अंबरनाथ अर्जुन सांगळे (वय-४१ रा. सिन्नर जि. नाशिक) यांनी फिर्यादी दिली की, दिनांक २/४/२०२१ रोजी रात्री ९:१५ वाजणेचे सुमारास त्यांना एका कारने माळीवाडा बस स्थानक येथुन प्रवासी म्हणुन बसवुन निमगांव वाघा शिवार येथे घेवुन जावुन लोखंडी रॉड ने मारहाण करुन त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम व एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले आहेत. या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दिनांक ४/४/२०२१ रोजी त्याच प्रकारचा दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.

सदर दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना खबरी मार्फत माहीती प्राप्त झाली की, गुन्ह्यातील वापरलेली होन्डा सिटी कार व आरोपी हे पारनेर व जामगांव परिसरातील राहणारे असुन ते नगर शहराकडे सदर कारने नेप्ती रोडने येणार आहेत. .नगर ग्रामिणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार व स्टाफ यांना योग्य त्या सुचना देवुन आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे कल्याण रोड परिसरात सापळा लावुन सदर चार चाकी वाहन मोठ्या शिताफिने पकडुन त्यातील चालक शुभम भागाजी बुगे,  रा. वुगेवाडी, ता. पारनेर, जि. अ. नगर,  विनोद सुधाकर पाटोळे, रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अ. नगर,  आकाश संतोष नायकोडी, रा.जामगांव, ता. पारनेर, जि. अ.नगर,  व एक विधी संघरषीत बालक असे मिळून आल्याने त्याना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यावरुन त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी एम.आय.डी.सी. पो.स्टे. हद्दीत व नगर तालुका पो.स्टे. हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याचे कडे एक होन्डा सिटी कार, लोखंडी रॉड, कोयता, तीन मोबाईल फोन असे ४,१५,०००/- रु. किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर व गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. विवेक पवार, पोलीस नाईक गणेश थोत्रे, विष्णु भागवत, नितीन शिंदे, शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, पोलीस कॉन्स्टेबल भारत इंगळे, सुमित गवळी, योगेश कवाष्टे, कैलास शिरसाठ, तान्हाजी पवार, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सोमनाथ राउत, प्रशांत राठोड (मोबाईल सेल) यांनी सदरची कारवाई केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post