खडकीत कोरोना कॅम्प तपासणीत ३० रुग्ण कोरोना बाधीत

 खडकी येथे कोरोना कॅम्प  तपासणीत ३० रुग्ण कोरोना बाधीत
अहमदनगर - खडकी ( ता. नगर ) येथे परीसरातील पाच सहा गावाचा मिळून  कोरोना रॅपीड टेस्टचा कॅम्प ग्रामपंचायत येथे आयोजीत करण्यात आला . या तपासणीत एकशे सहा रुग्णाची तपासणी केली असता तीस रुग्णाचा अहवाल पॉजीटिव्ह आला .

खडकी परीसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाची संख्या दिवसो दिवस वाढत चालली आहे . शहरात जाऊन तपासणी करणे शक्य नसल्यामुळे सरपंच प्रविण कोठुळे यांनी गावातच कोरोना टेस्टचा कॅ४प आयोजीत केला .. या कॅ४प मध्ये एकशे सहा रुग्णाची तपासणी केली असता तीस रुग्णाना कोरोना ची लागण झाली असल्याचे समजले . यामध्ये खडकी -१२, अरणगाव -५, हिवरे झरे -२, वाळकी -७ , सारोळा -४ खंडाळा -४, अकोळनेर -२ अशी गावी नहाय रूग्ण आहे . गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी गावात फवारणी करण्यात आली तसेच 

ग्रामपंचायतच्या मागास वर्गोय निधी मधून कुकर वाटप ग्रामस्तगांच्या वतीने ३०० सॅनिटायझर बॉटल, २५० मास्क, ३०० ट्रीप व्हिटॅमिन सि गोळी या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके,सरपंच प्रवीण कोठुळे मा. सरपंच अर्चना प्रवीण कोठुळे ,उपसरपंच सुरेखा गायकवाड, ज्योती कोठुळे, मनीषा कोठुळे ,मा उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, भाऊसाहेब बहिरट, चेअरमन राहुल कोठुळे , रतन तात्या, आदिनाथ गायकवाड, सुधाकर कोठुळे , सुनील कोठुळे , मनेश भोसले ,,बाळू कांबळे ,व . विकास पिंपरकर , डॉ. विजय नेटके , हर्षदा निकम , लता वाघमारे उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post