केडगांव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने जागरूक पत्रकारिता सन्मान

 जागरूक पत्रकारिता सन्मान     
          केडगांव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने कोरोना काळात निर्भिडपणे प्रशासनास , राजकारण्यांस सद्यस्थिती बद्दल अवगत करण्यात तसेच  निष्पक्ष व लोक जागृतीच्या पत्रकारिते बद्दल जागरूक पत्रकारिता सन्मानाचे वितरण करण्यात आले. मंचाने कोरोना काळात करत असलेल्या कामाबद्दल इथून मागे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी ,108 एम्बुलेंस सेवा कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी यांच मनोबल सन्मानाच्या माध्यमातून वाढवण्याचा व समाजाचा आपणास आपल्या कार्यास असलेला पाठिंबा व सहकार्य व्यक्त केले आहे तरी आज तीन टप्प्यात शासकीय  नियम व अटी यांचे पालन करून केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात अहमदनगर प्रेस क्लब चे अध्यक्ष समीर मणियार, नगर पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच लोकमतचे पत्रकार  योगेश गुंड ,दैनिक पुण्यनगरी चे प्रकाश चव्हाण, सी न्यूज मराठी चे शुभम पाचारणे, प्रसाद शिंदे ,भारत पवार , बातमीपत्र२४ चे पत्रकार अमोल गायकवाड , विजय गोघरे , राजेश सटाणकर सीटी टाइम्स , अहमदनगर न्यूज २४ चे तेजस शेलार , महानगर न्यूज पत्रकार सचिन शिंदे,  विक्रम लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला . प्रसंगी प्रसाद पाटसकर , पुनम तानवडे, जालिंदर शिंदे , अक्षय शिंदे , प्रविण पाटसकर , किशोर पाटील, मंदार सटाणकर व मंचाचे अध्यक्ष श्री.विशाल पाचारणे उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post