रेमडिसीव्हरसाठी जिवाचा आटापिटा : रुग्णांचे बेहाल इंजेक्शनसाठी रूग्णांचे नातेवाईक रस्त्यावर

 रेमडिसीव्हरसाठी जिवाचा आटापिटा :  रुग्णांचे बेहाल :  इंजेक्शनच्या शोधात  नातेवाईकांची  दमछाक 

केडगावमध्ये इंजेक्शनसाठी रूग्णांचे  नातेवाईक  रस्त्यावर  !

 
केडगाव  - केडगाव मधील कोरोना रूग्णांची वाढती संख्या अनियंत्रीत होत असतानाच आता या रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसीव्हर इंजेक्शन मिळेणासे झाले आहे . इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांचे नातेवाईक आज केडगावमध्ये थेट रस्त्यावर उतरले . पोलिसांनी मध्यस्ती केली तरीही रुग्णांना इंजेक्शन मिळाले नाहीत .


केडगावमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . संपुर्ण परिसरात सध्या ५०० पेक्षा जास्त रूग्ण सक्रिय असुन केडगावमधील विविध खासगी दवाखान्यात जवळपास ४०० रूग्ण उपचार घेत आहेत . रुग्णसंख्येत दिवसागणिक भर पडत असल्याने केडगावमधील आरोग्य सेवेवर त्याचा ताण पडत आहे . रूग्णसंख्या नियत्रंणात आणण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत चालले आहे .


केडगावमधील विविध खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांना सध्या तीन दिवसांपासुन रेमडिसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे . वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याने अनेक रूग्णांचे उपचार अर्थवट आहेत . इंजेक्शन अभावी उपचार पुर्ण होत नसल्याने  रूग्णांना घरी सोडले जात नाही . गेल्या दोन दिवसांपासुन केडगावमध्ये रूग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळवण्यासाठी आटापिटा करीत आहेत . अनेकजण रात्रभर फिरून इंजेक्शन कुठे मिळते का याचा शोध घेत होते मात्र एवढे करूनही रुग्णांना काल रात्रीपर्यत इंजेक्शन मिळू शकले नाही .


केडगाव मधील अधिकृत औषध विक्रेत्यांने सकाळी इंजेक्शन मिळेल असे रूग्णांच्या नातेवाईकांना सांगितल्याने आज भल्या सकाळपासुनच रूग्णांच्या नातेवाईकांनी केडगावमधील नरेंद्र मेडिकल स्टोअर मध्ये गर्दि केली .मात्र साडे दहा वाजुन गेले तरी मेडिकल न उघडल्याने नातेवाईक संतप्त झाले . त्यांनी नगर - पुणे रस्त्यावरच ठिय्या मांडत आपला संताप व्यक्त केला . कोतवाली पोलिसांनी मध्यस्ती करीत मेडिकल चालकाला बोलावुन घेतले .आमच्याकडे रात्री आलेले  सर्व इंजेक्शन आम्ही औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रात्री तुनच वाटुन टाकले असे स्पष्टिकरण मेडिकल चालकाने दिले . मात्र रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नसल्याने शेवटी कोतवाली पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी मेडिकल चालकाला आपल्या ताब्यात घेतले .

मात्र एवढे करूनही शेवटी रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्याने त्यांची वणवण सुरूच होती .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post