बारा बाभळी येथे गरजुना धान्य वाटप - कवडे कुटुंबाचा पुढाकार

 बारा बाभळी येथे गरजुना धान्य वाटप - कवडे कुटुंबाचा पुढाकारअहमदनगर: - राज्यात कोरोना ने थैमान घातले आहे . रूग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉक डाऊन केल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकाची उपासमारी होऊ नये यासाठी बाराबाभाबी येथील  समाजसेवक शंकर  कवडे यांचे कुटुंब सरसावले .येथील  ३२ गरजू ना किराणा व धान्य वाटप करुन मदतीचा हात पुढे केला. बाराबाभळी ( ता.नगर ) या परीसरात कोरोना रूग्ण संख्या वाढत  चालले आहे . ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला कोरोनानी विळखा घातला . कुंटुब उद्धवस्त होत आहे .कोरोना ची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी लॉक डाऊन जाहीर केला . यामुळे सर्व दुकाने बाजारपेठा बंद झाल्या आहे . यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिंकाची उपासमार होऊ लागली आहे . अशा गरजुसाठी येथील थोर समाजसेवक शंकर कवडे यांनी सामाजीक बांधीलकी जपत गावातील ३२ कुंटुबा ना किराणा व धान्य वाटप केले . या मुळे या कुंटुबाला आधार मिळाला आहे . सध्या सर्वत्र अशी परीस्थिती निर्माण होणार आहे तरी सर्वांनी या गरींब साठी मदत करणे गरजेचे आहे असे अवाहन कवडे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post