पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का...कल्याण काळेंनी बांधले राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’

 

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का...कल्याण काळेंनी बांधले राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’पंढरपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करुन माढा लोकसभा जिंकून देणारे कल्याणराव काळे यांनी अवघ्या दीड वर्षात भाजपाला सोडचिट्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. सध्या पंढरपूरची पोटनिवडणूक सुरु असून कल्याण काळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीने अर्धी लढाई जिंकली आहे. पंढरपूरचे कल्याणराव काळे हे 2014 साली अपक्ष माढा विधानसभा मतदारसंघातून लढले होते, त्यावेळी त्यांना 62 हजार मते मिळाली होती. वास्तविक पंढरपूर मतदारसंघ सांगोला, माढा, मोहोळ आणि पंढरपूर अशा चार विधानसभा मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात विभागाला गेला. असं असलं तरी काळे यांचा प्रभाव या चारही मतदारसंघात असल्याने राष्ट्रवादीला कल्याणराव काळे हे चार विधानसभा व दोन लोकसभा मतदारसंघात मोठे फायदेशीर ठरणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post