सारोळा कासार सोसायटीच्या चेअरमनपदी संजय काळे तर व्हाईस चेअरमनपदी मनिषा कडुस

 सारोळा कासार सोसायटीच्या चेअरमनपदी संजय काळे तर व्हाईस चेअरमनपदी मनिषा कडुससारोळा कासार सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संजय रावसाहेब काळे तर व्हाईस चेअरमनपदी साै. मनिषा शिवाजी  कडुस यांची आज रविवारी (दि.११) बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारोळा कासार ऐवजी नगरमधिल जिल्हा बँकेच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षते खाली ही निवड प्रक्रिया पार पडली. 

सारोळा कासार सोसायटीच्या दि.३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत शिक्षकनेते संजय धामणे यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही विकास आघाडीने १३ पैकी १३ जागा जिंकतो पंचायत समिती सदस्य रविंद्र कडुस यांच्या गटाचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर रविवारी पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.

चेअरमन पदासाठी संजय काळे यांच्या नावाची सुचना गोरक्षनाथ काळे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब धामणे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी साै.मनीषा कडुस यांच्या नावाची सुचना जयप्रकाश पाटील यांनी मांडली.त्यास शिवाजी वाव्हळ यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक संजय धामणे, बापूराव धामणे, महेश धामणे, चंद्रभान जाधव, बाळासाहेब धामणे, नामदेव पाटील, सुभाष धामणे, विठ्ठल कडुस आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post