जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्स बाबत जिल्हा प्रशासनाकडून 24x7 कंट्रोल रूम कार्यान्वित

 जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्स बाबत आता अद्यावत माहिती मिळणार


जिल्हा प्रशासनाकडून 24x7 कंट्रोल रूम कार्यान्वित


अहमदनगर:  जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेइची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता  24 x 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून  त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460  असा आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती उर्मिला पाटील यांची तर सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली आहे.


नागरीकांनी जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती

मिळणेकरीता सदर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. सदर कंट्रोल रुम 24 X7 सुरु राहील, असे कळविण्यात आले आहे.*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post