कडेकोट लॉकडाऊन, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून घेतला आढावा

  

नगर शहरात रविवारी कडेकोट लॉकडाऊन, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून घेतला आढावा
नगर:   आज नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फोर्स फाट्यासह एक प्रकारे संचालन करून बंदचा आढावा घेतला.दरम्यान जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिले असल्याचे सांगितले. तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जो कोणी विनाकारण फिरत आहे त्याला आम्ही पोलिस ठाण्यामध्ये आणून  फिरण्याचे कारण योग्य नसल्यास त्याचे  समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

शनिवार व रविवार असल्यामुळे  जनता कर्फ्युची   काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार आज जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरातील पाईपलाईन रोड,  सावेडी भागांमध्ये आज दुपारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बंदचा आढावा घेतला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.पुणे बस स्थानक ,माळीवाडा ,कापड बाजार, नवी पेठ,  दिल्ली गेट या मार्गाने या बंदचा आढावा घेण्यात आला. होता

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post