कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांनी उत्फुर्तपणे पाझ्मादान करुन कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्या बांधवांसाठी मानवतादूत बनावे

कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांनी उत्फुर्तपणे पाझ्मादान करुन कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्या बांधवांसाठी मानवतादूत बनावे. - जनआरोग्य फाऊंडेशन महाराष्ट्र.
 

अहमदनगर . राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या प्रार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यातील सर्वच भागात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणार्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांचे योग्य उपचारा अभावी म्रुत्यु होत आहेत. अश्यातच प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी आशेचा किरण बनली आहे परंतु प्लाझ्मादाना विषयी समाजात जनजागृती नसल्याने रुग्णांना योग्य वेळी प्लाझ्मा मिळणे कठीण होत आहे. कोरोना उपचारासाठी लागणार्या औषधांचे सुनियोजन करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर चालले असताना कोरोनातून बरे झालेल्या नागरीकांनी प्लाझ्मादान करुन आपल्या समाजबांधवाचे प्राण वाचविण्यास मदत करावी असे अवाहन जनआरोग्य फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष मा. योगिराज धामणे यांनी केले आहे.

*प्लाझ्मादान कोण करु शकत...*

अश्या १८ ते ६० वयादरम्यानचे नागरिक ज्यांनी २८ते३० दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे.


कोरोनामुक्त होऊन चार -सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत करोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये कोरोना प्रादुर्भावाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज असू शकतात. ते प्लाझ्मादान करु शकतात.

उच्च रक्तदाब ,ह्रदयविकार असलेले दाते डॉक्टरांच्या सल्याने प्लाझ्मा दान करु शकतात.

*प्लाझ्मादान कोण करु शकत नाहीत...*

असे कोरोनामुक्त नागरिक ज्यांचे वय १८ ते ६० या दरम्यान नाही.

ज्यांचे वजन ५०किलो पेक्षा कमी आहे.

गरोदर माता , स्तनपान करणाऱ्या माता , रक्ताचे जन्मजात आजार असणारे नागरिक , अलीकडील सहा महिन्यांत मोठी शस्त्रक्रिया झालेले नागरीक प्लाझ्मादान करु शकत नाहीत.

*प्लाझ्मादान कुठे करावे…*

शासनाच्या मान्यताप्राप्त रक्तपिढीमध्ये प्लाझ्मादान करता येते.किंवा ज्या रुग्णालयात रुग्णाला प्लामा ची गरज आहे अश्या रुग्णालयात सोयीनुसार प्लाझ्मा दान करता येते.

*प्लाझ्मादानामुळे कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती कमी होत नसुन एका योग्य प्लाझ्मा दात्यामुळे २-४ कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी मदत होऊ शकते.*

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळातील कोरोना नवीन स्ट्रेन आहे म्हणून गेल्या दोन ते तीन महीन्यात कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांचे प्लाझ्मादान हे कित्येक रुग्णांना नवसंजीवनी ठरु शकते.

*जर कोणा रुग्णाला प्लाझ्मादात्याची गरज असेल किंवा कुणाला प्लाझ्मा दान करायचे असेल किंवा प्लाझ्मादानाविषयी शंका असतील तर अश्या नागरीकांनी ७३५०६३३६७५ ,९३७०७९०७१२या क्रमांकावर संपर्क करावा असे अवाहन जनआरोग्य फाऊंडेशनचे प्रदेश संघटक मा.योगेशजी पिंपळे यांनी केले.*

कोरोना महामारीवर  मात करण्यासाठी प्रशासनाच्या सुचनांचे योग्य पालन गरजेचं असल्याचेही  ते म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post