जांभूळ शेती... एका एकरातून 16 लाखांचे उत्पन्न, आ.सुरेश धस यांनी केले कौतुक
नगर : श्रीगोंदा शहरालगत संपत कोथिंबीरे हे शेतकरी बहाडोली जातीची नाविन्यपूर्ण जांभूळ शेती करत आहेत.या शेतकर्याने एक एकर शेतीत 16 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या प्रजातीचे नवीन रोप ते स्वतः तयार करतात. आ.सुरेश धस यांनी स्वत: श्रीगोंद्यात कोथिंबीरे यांच्या या शेतीला भेट देवून पाहणी केली. यानंतर आ.धस यांनी फेसबुक पोस्टव्दारे कोथिंबीरे यांचे कौतुक करून कोरडवाहू शेतकर्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे. काय म्हटलय आ.धस यांनी...
माझे बंधु मनोज धस सर यांच्या माहितीवरून या शेतीला भेट दिली, या बहाडोली वाणाची सविस्तर माहिती घेतली, कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे हे फळ आहे,कोरडवाहू व कमी सुपिक शेतीला एक उत्तम पर्याय आहे. यावेळी श्रीगोंदा शहरातील सुपेकर सर,कोथिंबीरे बंधु मनोज धस सर व अन्य शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment